पणजी : सेवेत कायम करण्यासह विविध मागण्यांसाठी १२ नोव्हेंबरपासून बेमुदत संपावर जाणाऱ्या कदंब चालक व इतर कर्मचाऱ्यांना सरकारने एस्मा लागू केला आहे. (kadamba employees given esma amidst strike warning) याबाबतचा आदेश गृह खात्याने जारी केला आहे. सहा महिन्यांसाठी कोणत्याही प्रकारच्या संंपावर बंदी घातली आहे.
अत्यावशक सेवा व देखभाल कायदा १९८८च्या कलम ३ व उपकलम १ अंतर्गत सरकारने हा आदेश जारी केला आहे. यामुळे कदंब चालक व इतर कर्मचाऱ्यांनी संप केल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई होणार आहे. कदंब कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारबरोबर बोलणी सुरू आहेत. कर्मचाऱ्यांनी संपावर जाऊ नये, असे आवाहन कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास नाईक तुयेकर यांनी केले आहे.
या प्रस्तावित संपामध्ये कदंब बस सेवांशी संबंधित सर्व कर्मचारी आणि कामगार सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये इलेक्ट्रिक बसचे चालक आणि इतर संबंधित कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
नवीन 'इलेक्ट्रॉनिक तिकीटिंग मशीन' (ईटीएम) प्रणाली मागे घेणे, पाच वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या रोजंदारीवरील आणि तात्पुरत्या चालक व वाहकांना कायमस्वरूपी सेवेत करणे, सातव्या वेतन आयोगाची प्रलंबित थकबाकी देणे, तसेच भविष्य निर्वाह निधीतील योगदान आणि थकबाकी पुन्हा सुरू करणे यांचा समावेश आहे.


