पणजी : पर्वरी परिसरातील वीज ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना आहे. वीज खात्याने तातडीच्या देखभालीच्या कामासाठी ११ आणि १२ नोव्हेंबर रोजी दोन वेगवेगळ्या भागांत वीजपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (A power shutdown notice at Porvorim)
११ नोव्हेंबरला झोसेवाडा परिसरात वीज बंद
बुधवार, ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत पर्वरी येथील २०० केव्हीए झोसेवाडा डीटीसीअंतर्गत वीजपुरवठा बंद राहणार आहे. याचा फटका झोसेवाडा आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना बसणार आहे.
१२ नोव्हेंबरला शांतिनगरमध्ये वीज खंडित
गुरुवार, १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत पर्वरी येथील २०० केव्हीए शांतिनगर डीटीसीअंतर्गत वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. शांतिनगर आणि आसपासच्या भागांतील नागरिकांना याचा फटका बसणार आहे.
तातडीच्या देखभालीच्या कामासाठी वरील भागात वीजखंडित करण्यात येणार आहे. संबंधित भागांतील नागरिकांनी आवश्यक ती पूर्व तयारी करावी, असे आवाहन वीज खात्यातर्फे करण्यात आले आहे.


