म्हापसा : करासवाडा, म्हापसा येथे राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना कार गाडीची जोरदार धडक बसल्याने कवली चव्हाण (५४ वर्षे, मूळ उत्तरप्रदेश) पादचारी महिला ठार झाली.
हा अपघात आज मंगळवारी संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडला. महिला पळत राष्ट्रीय महामार्ग ओलांडत होती. त्यावेळी तिला भरधाव स्विफ्ट कारची धडक बसली. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली. तिला रूग्णवाहिकेतून म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या अपघाताचा पंचनामा म्हापसा पोलीस (Mapusa Police) स्थानकाचे हवालदार तुषार रेडकर यांनी केला. पुढील तपास पोलीस करत आहेत.


