वास्को : हेडलँड-सडा येथे सरकारी शाळेजवळ वाहन पार्क करण्यावरून झालेल्या वादातून एका महिलेच्या कारची काच दगड मारून फोडल्याची घटना घडली. याप्रकरणी मुरगाव पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हेडलँड-सडा येथील सरकारी शाळेजवळ सार्वजनिक रस्त्याच्या कडेला वाहन पार्क करण्यावरून हा वाद झाला. एका इसमाने वाहन पार्कींगवरून पल्लवी मालवणकर हिच्याशी वाद घातला. त्यानंतर या दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला.
त्यानंतर रात्री पुन्हा वाद वाढला. यावेळी त्या इसमाने पल्लवी मालवणकर यांच्या कारवर दगड मारून वाहनाची काच फोडल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या घटनेनंतर मालवणकर यांनी मुरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांकडून विलंब होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.


