मोरजी येथे वाहने रस्त्यावर फेफून वाहतूक रोखल्याप्रकरणी रशियन नागरिकाविरुद्ध गुन्हा

मोरजीतील न्यूवाडा येथे रस्त्यावर उभी केलेली दुचाकी वाहने फेकून देत वाहतूक रोखल्याप्रकरणी रशियन नागरिकाविरुद्ध मांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
just now
मोरजी येथे वाहने रस्त्यावर फेफून वाहतूक रोखल्याप्रकरणी रशियन नागरिकाविरुद्ध गुन्हा

पेडणे: मोरजीतील न्यूवाडा येथे रस्त्यावर उभी केलेली दुचाकी वाहने फेकून देत वाहतूक रोखल्याप्रकरणी रशियन नागरिकाविरुद्ध मांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास न्यूवाडा-मोरजी, पेडणे येथे संशयित आरोपी रोमन कामझोलकिन (वय ४०, रशियन नागरिक, सध्या रा. टेंबवाडा-मोरजी, पेडणे) याने रस्त्याच्या कडेला उभी केलेली दुचाकी वाहने रस्त्यावर फेकून त्यांचे नुकसान केले.

तसेच स्वतः रस्त्याच्यामध्ये उभे राहून बेकायदेशीररित्या वाहतूक रोखली. त्यामुळे वाहनचालक आणि रस्त्यावरील नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला. तसेच परिसरात उपद्रव आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

याप्रकरणी मांद्रे पोलीस स्थानकात कार्यरत जयदीप पालयेकर यांनी तक्रार नोंदवली. त्यावरून संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३च्या कलम ३२४(४), १२६(२), १२५ आणि २७० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मांद्रे पोलीस करीत आहेत.