उसगाव, फोंडा येथे दूध वाहतूक करणारा टेम्पो उलटला

रस्त्यावर मध्ये आलेल्या गुरांमुळे घडला अपघात; उसगाव येथील उतरणीवर दूध वाहतूक करणारा टेम्पो बुधवारी सकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास कोसळला. रस्त्यावर अचानक गुरे आल्याने अपघात घडला. अपघातात एक विजेचा खांब आणी एका घर मालकाचे कुंपण जमीनदोस्त झाले. मात्र अपघातात चालकासह अन्य दोघेजण सुखरूप बचावले.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
2 hours ago
उसगाव, फोंडा येथे दूध वाहतूक करणारा टेम्पो उलटला

फोंडा : उसगाव येथील उतरणीवर दूध वाहतूक करणारा टेम्पो बुधवारी सकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास कोसळला. रस्त्यावर अचानक गुरे आल्याने अपघात घडला. अपघातात एक विजेचा खांब आणी एका घर मालकाचे कुंपण जमीनदोस्त झाले. मात्र अपघातात चालकासह अन्य दोघेजण सुखरूप बचावले.

फोंडा भागात दूध पुरवठा करणारा एमएच-०७-एजे-०७३६ क्रमांकाचा टेम्पो वाळपई येथे जात होता. उसगाव येथील उतरणीवर अचानक गुरे रस्त्यावर आल्याने चालकाने ब्रेक लावल्यानंतर टेम्पो घसरून रस्त्याच्या बाजूला कोसळला. अपघता वेळी टेम्पो मध्ये असलेले चालकासह अन्य दोघे जण सुखरूप बचावले. अपघातात वीज खांब जमीनदोस्त झाल्याने परिसरात दुपारपर्यंत वीज पुरवठा खंडित झाला.

हेही वाचा
सर्व पहा