माधव खारवी यांची जीपीएससीच्या सदस्यपदी नियुक्ती

नेवरा येथील श्री दयानंद आर्य हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक माधव खारवी यांची गोवा लोकसेवा आयोगाच्या (जीपीएससी) सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
माधव खारवी यांची जीपीएससीच्या सदस्यपदी नियुक्ती

पणजी : नेवरा येथील श्री दयानंद आर्य हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक माधव खारवी यांची गोवा लोकसेवा आयोगाच्या (जीपीएससी) सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर दिला. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संस्कार आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.

त्यांच्या कार्यकाळात शाळेच्या शैक्षणिक तसेच सहशालेय उपक्रमांना चालना मिळाली. शिक्षण क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणारे खारवी हे नम्र, प्रामाणिक आणि शिस्तप्रिय शिक्षक म्हणून परिचित आहेत.

हेही वाचा
सर्व पहा