गोव्यात २४ तासांत जोरदार पावसाची शक्यता

‘अर्नब’ चक्रीवादळाचा प्रभाव; बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाच्या प्रभावामुळे गोव्यात पुढील २४ तासांत काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. ‘अर्नब’ चक्रीवादळ सध्या ओडिशाच्या दक्षिण किनारपट्टीजवळ आहे. ते २३ सप्टेंबरच्या रात्री ते २४ सप्टेंबरच्या पहाटेच्या दरम्यान आंध्र प्रदेश–दक्षिण ओडिशा किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
गोव्यात २४ तासांत जोरदार पावसाची शक्यता

पणजी : बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाच्या प्रभावामुळे गोव्यात पुढील २४ तासांत काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. ‘अर्नब’ चक्रीवादळ सध्या ओडिशाच्या दक्षिण किनारपट्टीजवळ आहे. ते २३ सप्टेंबरच्या रात्री ते २४ सप्टेंबरच्या पहाटेच्या दरम्यान आंध्र प्रदेश–दक्षिण ओडिशा किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे.

वादळामुळे  निर्माण झालेल्या खोल दाबाच्या क्षेत्राचा परिणाम गोव्यासह पश्चिम किनारपट्टीवरील हवामानावर होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) गोव्यात पुढील २४ तासांत काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तवली आहे.  वादळाचा परिणाम म्हणून राज्यात सध्या ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.

बंगालच्या उपसागरातील ही हवामान प्रणाली सध्या खोल दाबाच्या क्षेत्रात आहे. ती पश्चिम-वायव्य दिशेने सरकत आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, या प्रणालीचा प्रभाव आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशा किनारपट्टीवर अधिक जाणवण्याची शक्यता आहे. २३ सप्टेंबरच्या रात्री किंवा २४ सप्टेंबरच्या सुरुवातीला ही प्रणाली किनारपट्टी ओलांडण्याचा अंदाज आहे.

सतर्कता बाळगण्याचे आवाहन

दरम्यान, गोवा आणि कोकणासाठी २३ सप्टेंबर रोजी मुसळधार पावसासह मेघगर्जा, वीज आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. २४ सप्टेंबरलाही मेघर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतरच्या दिवसांसाठी सध्या कोणताही विशेष इशारा देण्यात आलेला नाही. त्यामुळे गोव्यातील नागरिकांनी पुढील २४ तासांत हवामानातील बदलांकडे लक्ष ठेवावे व सतर्कता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे. असा सल्ला देण्यात येत आहे.

हेही वाचा
सर्व पहा