मुलगी झाली तर पेढे वाटा  : मुख्यमंत्री

माझ्या घरी मुलगी जन्माला आली होती, तेव्हा मी पेढे वाटले होते. जिलेबी वाटली नव्हती. मुलगा-मुलगी यांच्यात भेदभाव करू नका. मुलगी म्हणजे घरातील लक्ष्मी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.


just now
मुलगी झाली तर पेढे वाटा  : मुख्यमंत्री

गोवन वार्ता  प्रतिनिधी

पणजी

माझ्या घरी मुलगी जन्माला आली होती, तेव्हा मी पेढे वाटले होते. जिलेबी वाटली नव्हती. मुलगा-मुलगी यांच्यात भेदभाव करू नका. मुलगी म्हणजे घरातील लक्ष्मी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.

मुरगाव येथे आयोजित वचनपूर्ती मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. आम्ही दिलेला शब्द पाळतो. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने आम्ही पूर्ण केली आहेत. आता काहीजण खोटे जाहीरनामे घेऊन तुमच्याकडे येतील; मात्र ते फसवे जाहीरनामे असतील, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला.      

काँग्रेसने महिलांच्या कल्याणासाठी एकही योजना सुरू केली नाही. पं. नेहरूंपासून राजीव गांधींपर्यंतच्या काँग्रेसच्या नेतृत्वाने महिलांच्या कल्याणाचा विचार केला नाही. भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या सन्मानासाठी अनेक उपक्रम राबविले. महिलांना राजकीय आरक्षण देण्यासाठी विधेयक मंजूर करण्यात आले असून लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळावे, हा सरकारचा उद्देश आहे. महिलांना आर्थिक मदत मिळावी यासाठी राज्य सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या ‘गृहआधार’ आणि ‘दयानंद सामाजिक सुरक्षा’ योजनांच्या वाढीव मानधनाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये निवडणुकीपूर्वी जमा केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले. 

विरोधकांच्या अपप्रचारांवर विश्वास ठेवू नका !

अपप्रचार आणि खोटे जाहीरनामे घेऊन काहीजण पुढे येतील; मात्र त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. आमचे सरकार पुन्हा सत्तेवर येईल. भाजपचे सरकार पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी काम करण्याची गरज आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

हेही वाचा
सर्व पहा