देशातील प्रमुख पर्यटनस्थळांवर होणार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा आता केवळ बंदिस्त सभागृहापुरता मर्यादित न राहता देशातील प्रमुख पर्यटनस्थळांवर आयोजित केला जाईल. यामुळे चित्रपटसृष्टी आणि पर्यटनाची सांगड घालून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
2 hours ago
देशातील प्रमुख पर्यटनस्थळांवर होणार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा

एकतानगर: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा यापुढे केवळ बंदिस्त सभागृहापुरता मर्यादित न ठेवता देशातील प्रमुख पर्यटनस्थळांवर आयोजित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. चित्रपटांच्या माध्यमातून देशांतर्गत व जागतिक पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय अश्विनी वैष्णव,केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री यांनी दिली.

या उपक्रमाची पार्श्वभूमी स्पष्ट करताना केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी सांगितले की, सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा असलेल्या एकतानगरसारख्या प्रेक्षणीय पर्यटनस्थळी राष्ट्रपती आणि चित्रपटसृष्टीतील दिग्गजांच्या उपस्थितीत असा भव्य सोहळा पार पडल्यास, त्या परिसराला जागतिक स्तरावर मोठी प्रसिद्धी मिळू शकते. त्यामुळेच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा औपचारिक सभागृहातून बाहेर काढून थेट पर्यटनस्थळांपर्यंत नेण्याचा हा प्रयत्न आहे.

पुढील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या आयोजनासाठी केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांकडून त्यांच्या राज्यातील सर्वोत्तम पर्यटनस्थळांचे प्रस्ताव मागवले आहेत. या प्रस्तावांमध्ये उत्कृष्ट पायाभूत सुविधांसह संबंधित पर्यटनस्थळाच्या सर्वांगीण विकासाचे नियोजन असणे अपेक्षित आहे. प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांचे मूल्यमापन करून सर्वोत्तम ठरणाऱ्या राज्यातील पर्यटनस्थळावर आगामी पुरस्कार सोहळा आयोजित केला जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ही योजना आखण्यात आली आहे. ज्याप्रमाणे जी-२० परिषदेच्या विविध बैठका देशाच्या कानाकोपऱ्यात आयोजित करण्यात आल्या, त्याच धर्तीवर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळाही देशाच्या विविध भागांत नेण्याचा प्रयत्न असल्याचे वैष्णव यांनी सांगितले. चित्रपटसृष्टीची देशातील पर्यटनस्थळांशी तल्याने संबंधित भागातील पर्यटनाला तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा
सर्व पहा