मद्यधुंद चालकाचा ढवळी येथे बसवरील ताबा सुटला; विजेच्या खांबाला धडक

अपघातात बसमधील प्रवासी जखमी, चालकाविरोधात गुन्हा दाखल; मद्यधुंद अवस्थेत बस चालवताना चालकाचा बसवरील ताबा सुटून ढवळी येथील हुंडाई शोरूमजवळ विजेच्या खांबाला धडकली. या अपघातात बसमधील काही प्रवाशांना गंभीर तसेच किरकोळ दुखापत झाली.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
1 hours ago
मद्यधुंद चालकाचा ढवळी येथे बसवरील ताबा सुटला; विजेच्या खांबाला धडक

फोंडा : मद्यधुंद अवस्थेत बस चालवताना चालकाचा बसवरील ताबा सुटून ढवळी येथील हुंडाई शोरूमजवळ विजेच्या खांबाला धडकली. या अपघातात बसमधील काही प्रवाशांना गंभीर तसेच किरकोळ दुखापत झाली.

याप्रकरणी फोंडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) रामदास गावस यांनी दिलेल्या तक्रारीवरून बसचालक सिद्धार्थ नाईक (रा. फोंडा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित चालक  सिद्धार्थ नाईक हा बस घेऊन फोंड्याहून बोरीच्या दिशेने जात होता. ढवळी येथील हुंडाई शोरूमजवळ पोहोचला असता त्याने बस निष्काळजीपणे व भरधाव पद्धतीने चालविल्याने त्याचा बसवरील ताबा सुटला. बस रस्त्याच्या डाव्या बाजूला जाऊन विजेच्या खांबाला धडकली.

या धडकेत बसमधील प्रवाशांना दुखापत झाली असून काही प्रवाशांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. चालकाने मद्यप्राशन करून वाहन चालविल्याचाही आरोप आहे. फोंडा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एएसआय रामदास गावस करीत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा