काँग्रेसचे २१ आमदार निवडून द्या; एकही फुटणार नाही याची​ हमी!

प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर : फोंडा येथे ‘गोवा राखण’ अभियानची सुरुवात

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
just now
काँग्रेसचे २१ आमदार निवडून द्या; एकही फुटणार नाही याची​ हमी!

फोंडा : गोव्यात येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत प्राप्त करून देण्यासाठी २१ आमदारांना निवडून द्या. त्यापैकी एकसुद्धा आमदार फुटणार नसल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली.

फोंडा येथील विठोबा मंदिरात भेट देऊन काँग्रेसतर्फे ‘गोवा राखण’ अभियानची सुरुवात करण्यात आली. त्यावेळी गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, राजेश वेरेकर, फोंडा काँग्रेस गट समितीचे अध्यक्ष व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजप सरकारने जनतेचा अपेक्षाभंग केला आहे. त्यामुळे गोव्यातील जनता काँग्रेसकडे आकर्षित होत आहे. २०२२ सालानंतर काँग्रेसच्या आमदारांनी भाजपात प्रवेश केला तरी यावेळी काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिल्यास एकसुद्धा आमदार फुटणार नाही. त्यामुळे काँग्रेसला २१ जागा देण्याचे आवाहन गिरीश चोडणकर यांनी जनतेला केले.

गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे म्हणाले, गेल्या काही वर्षांत रस्ते, पाणी व अन्य समस्या लोकांना भेडसावत आहेत. प्रश्न सोडविण्यासाठी भाजप सरकारने प्रयत्न केलेले नाहीत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखविण्यासाठी मतदार सज्ज झाले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर निश्चितपणे गोव्यात काँग्रेस सरकार सत्तेवर येणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.


हेही वाचा
सर्व पहा