मडगावात संशयास्पदरित्या वावरणाऱ्या तिघांना अटक, १४ मोबाईल जप्त

मडगाव पोलिसांनी पहाटे गस्तीदरम्यान जुन्या स्थानक रस्त्यावर संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या संशयावरून विविध कंपन्यांचे १४ मोबाईल फोन जप्त करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
मडगावात संशयास्पदरित्या वावरणाऱ्या तिघांना अटक, १४ मोबाईल जप्त

मडगाव : मडगाव पोलिसांनी नियमित गस्तीदरम्यान जुन्या स्थानक रस्त्यावर संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या तिघांना अटक केली असून, त्यांच्याकडून विविध कंपन्यांचे १४ मोबाईल फोन जप्त केले आहेत. हे मोबाईल चोरीचे असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

रविवारी, २९ नोव्हेंबर रोजी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास मडगाव पोलीस पथक जुन्या स्थानक रस्त्यावर गस्त घालत होते. त्या वेळी तीन व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना दिसून आल्या. चौकशीत त्यांची नावे जयसिंग चव्हाण, दूधनाथ चव्हाण आणि पंकज चव्हाण असल्याचे स्पष्ट झाले. जयसिंग आणि दूधनाथ हे नावेली येथील कोलमरोड परिसरात, तर पंकज मडगाव रेल्वे स्थानकाजवळ वास्तव्यास असून, तिघेही मूळचे उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत.

अंगझडतीदरम्यान तिघांकडे विविध कंपन्यांचे १४ मोबाईल फोन आढळून आले. या फोनच्या मालकीबाबत ते कोणतीही कागदपत्रे किंवा समाधानकारक माहिती देऊ शकले नाहीत. त्यामुळे चोरीच्या संशयावरून पोलिसांनी तिघांना अटक करून सर्व मोबाईल जप्त केले. जप्त फोनचे मूळ मालक कोण आहेत आणि अन्य गुन्ह्यांशी या संशयितांचा संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे.

पोलीस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिनेश गावकर, उपनिरीक्षक स्वदेश देसाई व पथकाने ही कारवाई केली. पोलीस अधीक्षक अक्षत आयुष आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गुरुदास कदम यांच्या देखरेखीखाली तपास सुरू असून, रात्री-अपरात्री व पहाटेच्या गस्तीमुळे गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यास मदत होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.



हेही वाचा
सर्व पहा