पणजी : केपे–कुडचडे रस्त्यावर झालेल्या दुचाकींच्या धडकेत तिघे जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक व स्थानिकांची घटनास्थळी मोठी गर्दी जमली. जखमींना उपचारासाठी नेण्याकरिता तात्काळ रुग्णवाहिका पाचारण करण्यात आली.
प्रत्यक्षदर्शी व संबंधित तरुणाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास ते पार्सल घेण्यासाठी रेस्टॉरंटकडे जात असताना हा अपघात घडला. संबंधित दुचाकीस्वार सावर्डे रस्त्याच्या दिशेने मार्गस्थ असताना येथे पोहोचल्यावर समोरून किंवा बाजूने आलेल्या वाहनाने साईडलाईट मारून धडक दिल्याचा दावा करण्यात आला ..


