भोमा ते जुने गोवे महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी भूमी संपादन प्रक्रिया सुरू

भोमा ते जुने गाेवे या महामार्गाच्या चौपदरीकरण करण्याची प्रक्र‌िया सुरू झाली आहे. या विषयी राज्य सरकारने भूमी संपादनाची अधिसूचना जारी करून संबंधित जमीन मालकांना आपल्या जमिनीच्या हितसंबंधांचे स्वरुप स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
just now
भोमा ते जुने गोवे महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी भूमी संपादन प्रक्रिया सुरू

पणजीः भोमा ते जुने गाेवे या महामार्गाच्या चौपदरीकरण करण्याची प्रक्र‌िया सुरू झाली आहे. या विषयी राज्य सरकारने भूमी संपादनाची अधिसूचना जारी करून संबंधित जमीन मालकांना आपल्या जमिनीच्या हितसंबंधांचे स्वरुप स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मोबदल्याची रक्कम निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू होणार. (Bhoma to old Goa highway four laning land acquisition process begins)

जुने गोवे एला ते कुंडई दरम्यान राष्ट्रीय महामार्ग ७४८ हा एकेरी रस्ता असणार. या पट्ट्यावर वाहतूक वाढल्याने एकेरी वाहतुकीमुळे अडचणी निर्माण होत होत्या. या महामार्गाच्या पट्ट्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव कित्येक वर्षांपासून सरकारकडे होता.

सरकारने आता ही प्रक्रिया अधिकृतरित्या चालीस लावून विशेष भूमी संपादन अधिकाऱ्यांनी भोमा ते जुने गोवे दरम्यान ७ किलोमीटर लांब पट्ट्यावर ‘हायब्रीड ॲन्युइटी’ पद्दतीने अतिरिक्त ८८६३ चौ. मीटर क्षेत्रफळाची जमीन संपादन करण्याची घोषणा केली आहे. सुरवातीला प्रथम पातळीवरील जमीन संपादन प्रक्र‌िया ही दक्षिण गोव्यातील भोमा आणि कुंडई या गावात होणार. 

भूमी संपादनासाठी फोंडा तालुक्यातील भोमा गावातील ३० जागा आणि कुंडई गावातील १२ जागा संपादन करण्यासाठी जमीन मालकांच्या यादीसह अधिसूचना जारी केली आहे. अशा जम‌िनीचे हितसंबंध असलेल्या सर्व व्यक्तींना कळीत केले आहे की, त्यांनी संबंधीत कागदपत्रांच्या पुराव्यासह स्वत: किंवा आपल्या प्रतिनिधी किंवा वकिलांच्या माध्यमातून भूमी संपादन सक्षम प्राधिकारिणी, भूमी संपादन अधिकारी यांच्या कार्यालयात, आल्तीन, पणजी-गोवा येथे १६ डिसेंबर पूर्वी सकाळी १० ते सायंकाळी ५.४५ पर्यंत उपस्थित रहावे आणि संपादन करण्यात येणाऱ्या जमिनीतील आपआपले हितसंबंध स्पष्ट करावेत.  

हेही वाचा
सर्व पहा