अयोध्येत ‘गोवा राम निवास’साठी सुमारे २३.५७ कोटींची जमीन खरेदी

गोव्यातून दर्शनासाठी जाणाऱ्यांना मिळणार लाभ

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
22nd March, 12:36 am
अयोध्येत ‘गोवा राम निवास’साठी सुमारे २३.५७ कोटींची जमीन खरेदी

पणजी : अयोध्या-उत्तर प्रदेश येथे गोवा राम निवास उभारण्यासाठी सुमारे २३.५७ कोटींची ३,८०१ चौरस मीटर जमीन राज्य सरकारने खरेदी केली आहे. रामलल्लाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या गोमंतकीय जनतेला या निवासाचा लाभ मिळणार आहे.

अयोध्येत राम मंदिराची उभारणी व्हावी, हे कोट्यवधी भारतीयांचे स्वप्न केंद्र सरकारने गतवर्षी पूर्ण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर देशभरातील लाखो भक्तांनी अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले. गोव्यातील राम भक्तांनीही मंदिराचे उद्घाटन होताच दर्शनासाठी अयोध्येत हजेरी लावली. त्याचवेळी गोव्यातून जाणाऱ्या भाविकांसाठी अयोध्येत गोवा निवास उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेली होती. त्यानुसार अयोध्येत गोवा राम निवास उभारण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी जाहीर केले. त्यानंतर लगेचच गोवा राम निवासासाठी सुमारे २३.५७ कोटींची ३,८०१ चौरस मीटर जमीन खरेदी केल्याचा आदेश सामान्य प्रशासन खात्याचे अवर सचिव श्रेयस डिसिल्वा यांनी जारी केला.

हेही वाचा