प्रतिनिधी । गोवन वार्ता
फोंडा :
बोरी येथील विद्यालयातून चोरी केलेल्या संगणक प्रकरणी फोंडा पोलिसांनी बोरी येथील एका युवकाला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात संशयित म्हणून सौरभ बोरकर याला अटक केली आहे. त्याला तीन दिवस पोलिस रिमांडवर घेण्यात आले आहे. स्वामी विवेकानंद विद्यालयात दोन दिवसांपूर्वी चार सीपीयु आणि दोन एलईडी मॉनिटर चोरीला जाण्याचा प्रकार घडला होता. याची किंमत अंदाजे एक लाख रुपये आहे. विद्यालयाच्या व्यवस्थापनाने पोलिस तक्रार केली होती. फोंडा पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.