सेक्स स्कँडल: समोर आले एचडी देवेगौडांचे नातू प्रज्वल रेवण्णांचे नाव;व्हिडीओ व्हायरल

माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णा यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. यासंबंधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एफआयआर नोंदवल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तपासाचे आदेश दिले आहेत.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
29th April, 10:27 am
सेक्स स्कँडल: समोर आले एचडी देवेगौडांचे नातू प्रज्वल रेवण्णांचे नाव;व्हिडीओ व्हायरल

हासन : माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू व हासनचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्यावर एका महिलेने लैंगिक छळ  केल्याचा खळबळजनक आरोप करत त्यांच्याविरुद्ध लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या कथित अश्लील व्हिव्हिडीओवरून निर्माण झालेल्या मोठ्या वादाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आज ही माहिती दिली. महिलेने दाखल केलेला एफआयआर हासन जिल्ह्यातील होलेनरसीपूर पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.Prajwal Revanna 'sex scandal' | Karnataka govt. announces SIT probe - The  Hindu

मात्र, जनता दल (सेक्युलर) खासदार आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवण्णा यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून, व्हायरल होत असलेला अश्लील व्हिडीओ डॉक्टर्ड आहे असे त्यांनी म्हटले आहे.तसेच याबाबत रीतसर तक्रारही त्यांनी सायबर सेलकडे केली आहे. यानंतर प्रज्वल रेवण्णा हे जर्मनीला रवाना झाले आहेत. आरोप करणारी महिला त्यांच्या घरी काम करणारी स्वयंपाकी असल्याचे बोलले जात आहे. महिलेने सांगितले की ती रेवण्णाची पत्नी भवानी हिची नातेवाईक आहे.Prajwal Revanna video shocker: Woman shares ordeal in alleged sex scandal |  Latest News India - Hindustan Times

महिलेने आरोप केला आहे की, तिने त्यांच्या घरी काम करण्यास सुरुवात केल्यानंतर चार महिन्यांनंतर रेवण्णा यांनी  तिचा लैंगिक छळ सुरू केला आणि त्यांचा मुलगा प्रज्वल रेवन्ना तिच्या मुलीला व्हिडिओ कॉल करून तिच्याशी अश्लील बोलायचा. रेवण्णा यांची पत्नी जेव्हाही घराबाहेर पडायची तेव्हा ते महिलांना स्टोअर रूममध्ये बोलावून त्यांना वाईट पद्धतीने स्पर्श करायचे, असा आरोप पीडितेने केला आहे. പ്രജ്വൽ രേവണ്ണ ജർമനിയിലേക്കു കടന്നു; കർണാടകയിൽ എൻ.ഡി.എ സഖ്യത്തെ  പിടിച്ചുകുലുക്കി സെക്‌സ് ടേപ്പ് വിവാദം | NDA candidate Prajwal Revanna sex  tape controversy ...

महिलेने दावा केला की प्रज्वलने तिच्या मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर तिने त्यांचा नंबर ब्लॉक केला. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आयपीसीच्या कलम ३५४ अ, ३५४ ड , ५०६ आणि ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्यावर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आणि त्या सर्वांचे अश्लील व्हिडिओ बनवल्याचे आरोप आहेत. यातील अनेक व्हिडिओ क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सीएम सिद्धरामय्या यांनी चौकशीचे आदेश दिलेत

कर्नाटकच्या सिद्धरामय्या सरकारने या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी स्थापन करून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य महिला आयोगाने सिद्धरामय्या सरकारला कारवाईची शिफारस केल्यानंतर एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. हासन जिल्ह्यात अश्लील व्हिडीओ क्लिप प्रसारित केल्या जात आहेत, ज्यामध्ये महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे दिसून येते, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. प्रज्वल हे हासन लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (NDA) उमेदवार होते, जेथे २६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले होते. जनता दल (सेक्युलर) हे गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एनडीएमध्ये सामील झाले होते.Karnataka govt forms SIT to probe alleged sex scandal involving Hassan MP Prajwal  Revanna - The Economic Times

भाजपने झटकले हात 

 प्रज्वल यांच्या कथित सेक्स टेपच्या वादापासून भाजपने सद्यघडीस दूर राहणेच पसंत केले आहे. भाजपचे प्रदेश प्रवक्ते एस प्रकाश म्हणाले, "एक पक्ष म्हणून आमचा व्हिडिओशी काहीही संबंध नाही किंवा प्रज्वल रेवण्णा यांच्या कथित सेक्स स्कँडलमध्ये राज्य सरकारने जाहीर केलेल्या एसआयटी तपासावर आमची कोणतीही टिप्पणी नाही."

हेही वाचा