हुथी बंडखोरांनी रशियाहून भारताकडे येणाऱ्या जहाजावर केला बॅलेस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
29th April, 09:57 am
हुथी बंडखोरांनी रशियाहून भारताकडे येणाऱ्या जहाजावर केला बॅलेस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला

होर्मुज : येमेनच्या हुथी बंडखोरांनी लाल समुद्रात अक्षरशः उच्छाद मांडला आहे. एकीकडे मध्यपूर्व आशिया युद्धाच्या सावटाखाली वावरत असतांनाच होर्मुजच्या सामुद्रधुनीतून आशियात येणाऱ्या जहाजांवर हल्ले होत आहेत. याचा फटका युरोप आणि आशियातील देशांच्या व्यापारावर होत आहे. अशीच एक घटना येमेननजीकच्या लाल समुद्रात घडली आहे. रशियातून भारताकडे तेलसाठा घेऊन येणाऱ्या जहाजावर हुथी बंडखोरांनी बॅलेस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला केला. यात जहाजाचे किरकोळ नुकसान झाले आहे. यात क्रू मेंबर्सना कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही.वेळीच हालचाल करून या आगीवर नियंत्रण मिळवण्यात क्रू मेंबर्सना यश आले. India-bound oil tanker hit by Houthis missiles in Red Sea attack - India  Today

अमेरिकन सैन्याच्या सेंट्रल कमांडने सांगितले की, बंडखोरांनी हल्ल्यात तीन क्षेपणास्त्रे डागली होती.  त्यापैकी एकाने पनामा-ध्वजांकित, सेशेल्स-नोंदणीकृत 'अँड्रोमेडा स्टार'चे नुकसान केले. हे जहाज रशियातील प्रिमोर्स्क येथून भारतातील वाडिनारकडे निघाले होते. हुथी लष्करी प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल याह्या सारीने नंतर बंडखोरांनी प्रसारित केलेल्या प्री-रेकॉर्डेड  निवेदनात शनिवारी पहाटे हल्ल्याचा दावा केला. अमेरीकन सेंट्रल कमांड सांगितले की, अँटिका-बार्बाडोस-ध्वज असलेले, लाइबेरियन-संचलित माईशा हे जहाजही हल्ल्याच्या वेळी जवळच होते. 

हेही वाचा