इन्स्टाग्राममुळे वाचला मुलीचा जीव; सुसाइड नॉटिफिकेशन मिळताच पोलीस झाले सतर्क

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
29th April, 11:57 am
इन्स्टाग्राममुळे वाचला मुलीचा जीव; सुसाइड नॉटिफिकेशन मिळताच पोलीस झाले सतर्क

आग्रा : देशातील तरुण वर्गात विविध कारणांमुळे नैराश्याचे प्रमाण वाढले आहे. आपल्या भावना समोरच्याकडे व्यक्त न  करता आल्याने अतिरिक्त दडपण येते आणि मग आत्महत्येसारखे पाऊल उचलले जाते. देशभरात दर दिवशी अशा विविध घटना समोर येतच असतात. उत्तर प्रदेशमधील आग्रा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरुणीचे आपल्या मैत्रिणीसोबत काहीतरी बिनसल्याने ती भलतीच निराश झाली. अशातच तिने गोळ्या खात असतानाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला.How to help someone who is suicidal : Shots - Health News : NPR

खाली आत्महत्येसारखे सूचक शब्द असलेले कॅप्शनही दिले.  दरम्यान हे सगळे झाल्यावर पोलिसांना नॉटिफिकेशन पोहोचले. त्यांनी तत्काळ त्या तरुणीचे घर गाठले. पोलिसांनी तिला समुपदेशन करत पुन्हा असे न करण्याची ताकीद दिली.समुपदेशनादरम्यान तरुणीने सांगितले की तिने तापाच्या गोळ्या घेतल्या होत्या. तेव्हा पोलिसांचा जीव भांड्यात पडला.Coping With A Planned Suicide: Lessons from Loss     

पोलीस भरती परीक्षा रद्द झाल्याने मुलीची आत्महत्या

याआधी फिरोजाबाद जिल्ह्यात एका मुलीने आत्महत्या केली होती. पोलीस भरती परीक्षा रद्द झाल्याने तरुणी निराश झाली होती. मार्च महिन्यात त्याने गळफास लावून आत्महत्या केली होती. ती अनेक वर्षांपासून पोलिसात भरती होण्याच्या तयारीत होती, असे सांगण्यात आले. २२ वर्षीय वर्षा ही नई बस्ती येथील रहिवासी होती. तिच्या कुटुंबीयांना ती खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन कुटुंबीयांची चौकशी केली. त्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला.After a student suicide - Centre for Suicide PreventionCentre for Suicide  Prevention

दोन दिवसांपूर्वी खरगोनमध्ये आणखी एक प्रकरण समोर आले होते. मध्य प्रदेशातील या जिल्ह्यात एका मुलीने आत्महत्या केली होती. तिच्या वडिलांना दारूचे व्यसन होते, त्यामुळे ती त्रस्त होती. याप्रकरणी अल्पवयीन मुलीने पोलिसांत तक्रारही दिली होती. वर्षभरापासून ती पोलीस ठाण्यात येत राहिली, मात्र तिची कुणीच दखल घेतली नाही, असे सांगण्यात येत आहे. यानंतर त्याने १०० हून अधिक वेळा डायल १०० वर कॉल केला, मात्र तरीही पोलिसांना जाग आली नाही. त्यानंतर मुलीने आत्महत्या केली. दारू पिऊन वडील आईला मारहाण करायचे, असे मुलीने सुसाईड नोटमध्ये लिहिले होते.Greater Noida: Instagram Alert Helps UP Police Save 20-yr-old Planning  Suicide | Delhi News, Times Now

हेही वाचा