राज्यातील ९ शिक्षकांना ‘मुख्यमंत्री वसिष्ठ गुरू पुरस्कार’ जाहीर

Story: गोवन वार्ता। न्यूज डेस्क |
10 hours ago
राज्यातील ९ शिक्षकांना ‘मुख्यमंत्री वसिष्ठ गुरू पुरस्कार’ जाहीर

पणजी : राज्य शिक्षण संचालनालयाने शिक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या ९ गुणवंत शिक्षकांना ‘मुख्यमंत्री वसिष्ठ गुरू पुरस्कार २०२५-२६’ जाहीर केले आहेत. हे पुरस्कार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते शनिवार दि. ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा हॉल, पणजी येथे प्रदान केले जातील.

पुरस्कारप्राप्त प्राथमिक शिक्षकांत ईश्वर रघुवीर परब, सरकारी प्राथमिक शाळा, सुर्ला, डिचोली, आरती अशोक कोळंबकर, सरकारी प्राथमिक शाळा, चावडी-काणकोण यांचा समावेश आहे. माध्यमिक शिक्षकांत नितीन नाईक, शारीरिक शिक्षक, शिवाजीराजे हायस्कूल, खोलपेवाडी, साळ-डिचोली, देवेंद्र साठे, दत्ताराम मंत्रवादी मेमोरियल हायस्कूल, म्हापसा, प्रशांत तारी, विशेष शिक्षक, गुजराती समाज एज्युकेशनल ट्रस्ट फॉर द हँडिकॅप्स स्पेशल स्कूल, आके-मडगाव, गौरीश आर. वर्णेकर, चित्रकला शिक्षक, श्री कात्यायणी बाणेश्वर हायस्कूल, काणकोण यांचा समावेश आहे.

हायस्कूल मुख्याध्यापकांत नरेंद्र नाईक, सरकारी हायस्कूल, हणखणे-पेडणे, माबेल मारिया पर्पेचुआ वाझ ई दा कोस्ता, मुख्याध्यापिका, माय दोस पोर्ब्स हायस्कूल, नुवे-सासष्टी (दक्षिण गोवा) यांचा समावेश आहे. उच्च माध्यमिक प्राचार्यांत उमेश नाईक, प्राचार्य, श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक शाळा, पिर्ण-बार्देश यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. 

हेही वाचा
सर्व पहा