मयडे ग्रामसभेत सरकारच्या नागरीकरण धोरणाविरोधात ठराव एकमुखाने मंजूर

मयडे पंचायतीच्या ग्रामसभेत गोवा सरकारच्या प्रस्तावित नागरीकरण धोरणला एकमुखाने विरोध करत ठराव मंजूर करण्यात आला. तसेच अवैध बांधकामांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी लावून धरली.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
26 mins ago
मयडे ग्रामसभेत सरकारच्या नागरीकरण धोरणाविरोधात ठराव एकमुखाने मंजूर

मयडे: गोवा सरकारने प्रस्तावित केलेल्या नागरीकरणधोरणाला मयडे पंचायतीच्या ग्रामसभेत तीव्र विरोध दर्शवण्यात आला .  मयडे गावाचे मूळ ग्रामीण स्वरूप आणि समृद्ध संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी सर्वानुमते हा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. गावावर लादण्यात येणाऱ्या नागरीकरणाच्या निर्णयामुळे स्थानिकांच्या अधिकारांवर व ग्रामपंचायतीच्या स्वायत्ततेवर गदा येऊ शकते, अशी भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली.

याशिवाय ग्रामसभेत गावातील वाढत्या अवैध बांधकामांचा मुद्दाही चांगलाच गाजला. पंचायत प्रशासनाकडून अवैध बांधकामांवर योग्य ती कायदेशीर कारवाई होत नाही, तोपर्यंत संबंधित ठिकाणचे सर्व गेट्स उघडे ठेवले जावेत, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी मांडली. यावर पंचायत राज कायद्यानुसार संपूर्ण प्रकरणाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सुमारे ३ ते ६ आठवड्यांचा कालावधी लागण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे. या निश्चित कालावधीत सर्व आवश्यक कायदेशीर पूर्तता करून कडक कारवाई पूर्ण करण्याचे आश्वासन पंचायत प्रशासनाने दिले आहे. या निर्णयामुळे मयडे गावातील स्थानिक अस्मितेचा लढा अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा
सर्व पहा