कला व संस्कृती संचालनालयातर्फे दोघांना दिलेले पुरस्कार मागे घ्यावेत : स्वाती केरकर

पात्र कलाकारांना पुरस्कार द्यावेत; केरकर यांची पत्रकार परिषदेत मागणी : कला व संस्कृती संचालनालयातर्फे २४ जून रोजी कला क्षेत्रातील कामगिरीसाठी राज्य पुरस्कार देण्यात आले. त्यातील महेश वेंगुर्लेकर व राजमोहन शेट्ये यांना देण्यात आलेल्या पुरस्कारांना स्वाती केरकर यांनी आक्षेप घेतला आहे. या दोघांनाही दिलेले पुरस्कार मागे घेऊन पात्र कलाकारांना द्यावेत अशी मागणी स्वाती केरकर यांनी केली आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
5 hours ago
कला व संस्कृती संचालनालयातर्फे दोघांना दिलेले पुरस्कार मागे घ्यावेत : स्वाती केरकर

पणजी : कला व संस्कृती संचालनालयातर्फे २४ जून रोजी कला क्षेत्रातील कामगिरीसाठी राज्य पुरस्कार देण्यात आले. त्यातील महेश वेंगुर्लेकर व राजमोहन शेट्ये यांना देण्यात आलेल्या पुरस्कारांना स्वाती केरकर यांनी आक्षेप घेतला आहे. या दोघांनाही दिलेले पुरस्कार मागे घेऊन पात्र कलाकारांना द्यावेत अशी मागणी स्वाती केरकर यांनी केली आहे. 

यासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वरील माहिती दिली. स्वाती केरकर यांनी सांगितले की, कला व संस्कृती संचालनालयाचे ‘फाईन आर्ट व पेंटींगमधील राज्य पुरस्कार महेश वेंगुर्लेकर यांना तर राज्य कलावृद्धी पुरस्कार राजमोहन शेट्ये यांना मिळाला होता. या दोघांनाही पुरस्कार मिळाल्यानंतर आपण माहिती हक्क कायद्याखाली कोणत्या आधारावर त्यांना पुरस्कार देण्यात आले; यासंदर्भातील सविस्तर माहिती मागवली. या माहितीतून ते दोघेही या पुरस्कारांसाठी पात्र नसल्याचे स्पष्ट झाले. यासंदर्भात माहिती हक्क कायद्याखाली मागवलेली कागदपत्रे दाखवून त्यांनी दोघेही पुरस्कारास पात्र नसल्याचा दावा केला. या दोघांनाही दिलेले पुरस्कार मागे घेऊन पात्र व्यक्तींना द्यावेत अशी आपली मागणी असल्याचे स्वाती केरकर यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात कला व संस्कृतीमंत्री रमेश तवडकर यांच्याशी पत्रव्यवहार करून माहिती दिल्याचे स्वाती केरकर म्हणाल्या. 

हेही वाचा
सर्व पहा