पणजी: पर्वरी पोलिस स्थानकात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय) म्हणून सेवा बजावणारे मदन पुरुषोत्तम तारी (४९ वर्षे) यांचे २१ ऑगस्ट आकस्मीक निधन झाले.
फोंडा तालुक्यातील वळवई गावचे मदन तारी एक उत्कृष्ट नाट्य कलाकार होते. गावातील सण-उत्सव, गणेशोत्सवाची सजावट, नाटक अशा कार्यक्रमांत उत्साहाने सहभागी होत होते. अनेक स्पर्धेतील नाटकांत त्यांनी विविध भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दीड वर्षांची मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


