गोव्यात ईद-ए-मिलादची विशेष सुट्टी आता २६ ऑगस्ट रोजी

गोवा सरकारने ईद-ए-मिलादनिमित्त जाहीर केलेल्या सुट्टीत बदल केला असून मंगळवार २५ ऑगस्टऐवजी आता बुधवारी २६ ऑगस्ट २०२६ रोजी अधिकृत ‘विशेष सुट्टी’ घोषित करण्यात आल्याची सुधारित अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
13 mins ago
गोव्यात ईद-ए-मिलादची विशेष सुट्टी आता २६ ऑगस्ट रोजी

पणजी : गोवा सरकारने ईद-ए-मिलाद सणाच्या निमित्ताने देण्यात येणाऱ्या अधिकृत सुट्टीच्या तारखेत अंशतः बदल केला आहे. राज्य शासनाच्या सर्वसामान्य प्रशासन खात्याकडून जारी करण्यात आलेल्या नवीन अधिसूचनेनुसार, राज्यात पूर्वघोषित मंगळवार, २५ ऑगस्ट २०२६ ऐवजी आता बुधवारी, २६ ऑगस्ट २०२६ रोजी अधिकृत 'विशेष सुट्टी' घोषित करण्यात आली आहे.

शासनाने यापूर्वी ३० सप्टेंबर २०२५ आणि ७ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत अधिसूचनांमध्ये आवश्यक दुरुस्ती करून हा निर्णय घेतला आहे. गोव्याच्या राज्यपाल महोदयांच्या आदेशानुसार सर्वसामान्य प्रशासन खात्याकडून ही सुधारित अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या निर्णयानुसार २६ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व शासकीय कार्यालये, निमशासकीय संस्था आणि इतर आस्थापनांना ही विशेष सुट्टी लागू राहणार आहे. दरम्यान शाळा, विद्यालयांनाही ईद ई मिलादची सुट्टी २६ ऑगस्ट रोजीच असेल. याबाबत शिक्षण संचालकांकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

हेही वाचा
सर्व पहा