मौजमजेसाठी चोरीचा कट; ओळख उघड होण्याच्या भीतीने दोन विद्यार्थ्यांनी केला मुख्याध्यापिकेचा खून

तेलंगणातील नलगोंडा येथे आयफोन आणि गोवा ट्रिपच्या मौजमजेसाठी १०वीच्या दोन विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापिकेवर २७ वार करून हत्या केली. पोलिसांनी अत्यंत कौशल्याने 'बाबू' या एका शब्दावरून या निर्घृण गुन्ह्याचा छडा लावला

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
6 mins ago
मौजमजेसाठी चोरीचा कट; ओळख उघड होण्याच्या भीतीने दोन विद्यार्थ्यांनी केला मुख्याध्यापिकेचा खून

हैदराबाद : तेलंगणातील नलगोंडा येथील नागार्जुन पब्लिक स्कूलच्या ४८ वर्षीय मुख्याध्यापिका कल्लु रूपा रेड्डी यांच्या झालेल्या निर्घृण हत्येने संपूर्ण शैक्षणिक क्षेत्र आणि समाजमन सुन्न झाले आहे. महागडा आयफोन खरेदी करणे, गोव्याला फिरायला जाणे आणि मौजमजा करण्यासाठी इयत्ता १०वीत शिकणाऱ्या अवघ्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी आपल्याच मुख्याध्यापिकेवर चाकूने तब्बल २७ वार करून त्यांची निर्घृण हत्या केली.  १२ ऑगस्ट रोजी घडलेल्या या भयानक गुन्ह्याचा छडा नलगोंडा पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणे आणि तांत्रिक कौशल्याचा वापर करून लावला असून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

Latest and Breaking News on NDTV


१२ ऑगस्ट रोजी हैदराबादहून पतीने वारंवार फोन करूनही रूपा रेड्डी यांनी प्रतिसाद न दिल्याने संशय बळावला. शेजाऱ्यांनी घरात जाऊन पाहिले असता रूपा रेड्डी यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळून आल्या. तपासाच्या सुरुवातीला कोणताही प्रत्यक्ष पुरावा उपलब्ध नव्हता. पोलिसांनी फॉरेन्सिक टीम, तांत्रिक विश्लेषण आणि सीसीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सुमारे ८० हून अधिक संशयितांची कसून चौकशी केली. मात्र, तपासाला खरी दिशा मिळाली ती मृत मुख्याध्यापिकेच्या शेवटच्या कॉल रेकॉर्डिंगमधील एका शब्दाने. फोन बंद होण्यापूर्वी त्यांनी आपल्या मावशीशी बोलताना 'बाबू' हा शब्द उच्चारला होता. मुख्याध्यापिका आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना अत्यंत प्रेमाने 'बाबू' म्हणायच्या, ही माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची संपूर्ण चक्रे शाळेतील विद्यार्थ्यांकडे वळवली.

Latest and Breaking News on NDTVLatest and Breaking News on NDTV


शाळेत गैरहजर असलेल्या संशयित विद्यार्थ्यांची माहिती घेताना दोन विद्यार्थी अचानक अफाट पैसे उधळत असल्याचे आणि मित्रांना पार्ट्या देत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन पोलिसी हिसका दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. हॉस्टेलमध्ये नियमभंग केल्यामुळे मुख्याध्यापिकेने काही दिवसांपूर्वी त्यांच्या पालकांना बोलावून कानउघाडणी केली होती व त्यांना हॉस्टेलमधून बाहेर काढले होते. याच रागातून व झटपट श्रीमंत होण्यासाठी त्यांनी युट्यूबवर चोरीच्या पद्धती शोधल्या. पाच दिवस रेकी केल्यानंतर एका विद्यार्थ्याने बेडरूममधून अडीच लाख रुपये चोरले. मात्र, पळताना मंकी कॅप घसरल्याने मुख्याध्यापिकेने त्याला ओळखले. आपली ओळख उघड होईल या भीतीने आरोपीने चाकूने सपासप २७ वार करून त्यांचा बळी घेतला. हत्येनंतर रक्ताने माखलेले कपडे गाडून दोन्ही आरोपी आयफोन खरेदी करत गोव्याला पसार झाले होते. पोलिसांनी त्यांच्याकडून १.५४ लाख रुपये, आयफोन आणि गुन्ह्यातील साहित्य जप्त केले आहे.

Latest and Breaking News on NDTV

हेही वाचा
सर्व पहा