मेशू डिकॉस्टा, दत्तराज राऊत देसाई यांना जामीन मंजूर

सांगे पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांशी वाद घालून त्यांना धमकावणे तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटकेत असलेले मेशू डिकॉस्टा आणि दत्तराज राऊत देसाई यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
23 mins ago
मेशू डिकॉस्टा, दत्तराज राऊत देसाई यांना जामीन मंजूर

पणजी : सांगे पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांशी वाद घालून त्यांना धमकावणे तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटकेत असलेले मेशू डिकॉस्टा आणि दत्तराज राऊत देसाई यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

दोघांविरुद्ध सांगे पोलिसांनी संबंधित प्रकरणात कारवाई करत त्यांना अटक केली होती. पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांशी वाद घालणे, त्यांना धमकावणे तसेच त्यांच्या कर्तव्यात अडथळा निर्माण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

या प्रकरणात अटकेनंतर दोघांनी जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने तो मंजूर केल्यानंतर मेशू डिकॉस्टा आणि दत्तराज राऊत देसाई यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

हेही वाचा
सर्व पहा