छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतरित करण्यासाठी सरकारचे प्रयत्न

एमपीएच्या जमिनीवरील पुतळा अन्य ठिकाणी हलविण्याची तयारी सुरू असल्याची माहिती अ‍ॅडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात दिली. पुढील सुनावणी २५ ऑगस्टला होणार आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतरित करण्यासाठी सरकारचे प्रयत्न

पणजी : मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या (एमपीए) (MPA)  जमिनीवर असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती अ‍ॅडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनीगोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात दिली. 

पुतळा स्थलांतरित करण्यासाठी योग्य पर्यायी जागेचा शोध घेण्यासह आवश्यक प्रक्रिया सरकारकडून सुरू असल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. या प्रकरणातील पुढील सुनावणी मंगळवार, २५ ऑगस्ट रोजी होणार आहे.

एमपीएच्या जमिनीवरील पुतळ्याच्या स्थलांतराचा मुद्दा न्यायालयासमोर असून, सरकारच्या पुढील भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा
सर्व पहा