पणजी : महिला पत्रकारावरील लैंगिक अत्याचार प्रकरणात गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने तरुण तेजपाल याला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयाच्या या आदेशाविरुद्ध तेजपाल याने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावत शिक्षा रद्द करण्याची मागणी याचिकेतून केली आहे.
२०१३ मध्ये गोव्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तेजपाल यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणाची दीर्घ न्यायालयीन प्रक्रिया झाल्यानंतर उच्च न्यायालयाने त्यांना दोषी ठरवत शिक्षा सुनावली होती.
तेजपाल यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयातील निष्कर्षांना आव्हान देत सर्वोच्च न्यायालयाकडे दिलासा देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या पुढील सुनावणीकडे लक्ष लागले आहे.


