८वा वेतन आयोग: २.५७ चा फिटमेंट फॅक्टर लागू केल्यास पगार किती वाढू शकतो; माहिती घ्या

८ व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन वाढ करण्यासंदर्भात प्रक्र‌िया सध्या सुरू आहे. यावर सल्लामसलत सुरू आहे. देशभरातील केंद्र सरकारी कर्मचारी, केंद्रशासित प्रदेशांचे कर्मचारी, पेन्शनधारक, संबंधित संघटना व इतरांशी संवाद साधत आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
4 hours ago
८वा वेतन आयोग: २.५७ चा फिटमेंट फॅक्टर लागू केल्यास पगार किती वाढू शकतो; माहिती घ्या

नवी दिल्ली : ८ वा वेतन आयोग (8th Pay Commission) याच अनुषंगाने वेतन (उदा. फिटमेंट फॅक्टर, सॅलरी स्ट्रक्चर, पे मॅट्रिक्स), भत्ते (महागाई भत्ता, महागाई दिलासा, एचआरए) व इतर सुविधा/लाभांमध्ये (उदा. वेतनवाढ, पदोन्नती) कोणते बदल करणे शक्य आहे व आवश्यक आहेत, याची पडताळणी सध्या सुरू आहे. त्याचबरोबर तर्कसंगतता, सद्यस्थितीतील कार्यात्मक गरजा आणि विशेष गरजांचाही आयोग विचार करत आहे. 

१ कोटींहून अधिक जणांना होणार फायदा 

आयोगाचा हा निर्णय १ कोटीहून अधिक जणांना फायदेशीर ठरू शकतो. यामध्ये संरक्षण क्षेत्रातील कर्मचारी, रेल्वे आणि निवृत्त कर्मचारी असे अंदाजे ५० लाख केंद्र सरकारचे कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारक समाविष्ट आहेत. देशभरातील ६० कोटी कामगारांपैकी ०.७ टक्के आणि देशाच्या संघटित क्षेत्रातील सुमारे ९ टक्के हिस्सा हा केंद्र सरकारी कर्मचारी आणि सशस्त्र दलाच्या जवानांचा आहे. 

कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या अनेक संघटना १.८३ ते ३.८३ दरम्यान वेगवेगळ्या फिटमेंट फॅक्टरची मागणी करत आहेत. मात्र, ८व्या वेतन आयोगाने कोणतीही अधिकृत शिफारस केलेली नाही आणि त्याची अंमलबजावणी करण्यापूर्वी आयोगाला केंद्र सरकारच्या मंजुरीची आवश्यकता आहे. 

फिटमेंट फॅक्टरची गणना कशी केली जाते?

फिटमेंट फॅक्टर एक मल्टीप्लायर आहे. हा मल्टीप्लायर जुन्या मूळ वेतनाचे व पेन्शनचे नवीन, सुधारित मूळ वेतन रचनेत रूपांतर करताना वापरण्यात येतो.

मूळ सूत्र: सध्याचे मूळ वेतनx फिटमेंट फॅक्टर = नवीन मूळ वेतन 

उदाहरण म्हणजे ७व्या वेतन आयोगात २.५७ चा फिटमेंट फॅक्टर लागू करण्यात आला होता, ज्यामुळे मूळ वेतन ७ हजार रुपयांवरून वाढून १८ हजार झाले होते.

२.५७ चा फिटमेंट फॅक्टर पुन्हा आल्यास वेतनात किती वाढ होऊ शकते?

७ व्या वेतन आयोगाच्या मूळ वेतनाला २.५७ फिटमेंट फॅक्टरने गुणल्यास ८व्या वेतन आयोगात वेतनात किती वाढ होऊ शकते, याचे वेगवेगळे पे मॅट्रिक्स लेव्हलनुसार केलेले अंदाजित गणित खालीलप्रमाणे आहे.

आकडे रुपयांमध्ये 

१. लेव्हल १ : १८,०००   ४६,२६० 

२.लेव्हल २ : १९,९००   ५१,१४३

३.लेव्हल ३ : २१,७००   ५५,७६९

४.लेव्हल ४ : २५,५००   ६५,५३५

५. लेव्हल ५ : २९,२००   ७५, ०४४

६. लेव्हल ६ : ३५,४००  ९०,९७८

७.लेव्हल ७ : ४४,९००  १,१५,३९३ 

८. लेव्हल १० : ५६,१००  १,४४,१७७

९.लेव्हल १३ : १,२३,१०० ३,१६,३६७

१०.लेव्हल १८ : २,५०,०००  ६,४२,५००

८व्या वेतन आयोगाने जर २.५७ चाच फिटमेंट फॅक्टर लागू केला तर सर्वात खालच्या स्तरावरील (लेव्हल १) मूळ वेतन १८ हजार रुपयांवरून ४६,२६० पर्यंत वाढणार आहे. सर्वात वरच्या स्तरावरील (लेव्हल १८) मूळ वेतन २.५ लाख रुपयांवरून ६.४२ लाख रुपयांवर पोहोचू शकते.  

हेही वाचा
सर्व पहा