बाजार वार्ता : म्हापशात मासळीची आवक घटल्याने दर चढेच

भाजीपाला, कडधान्याचे दर स्थिर : लसूण २६० रुपये, वालपापडी १६० रुपये किलाे

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
36 mins ago
बाजार वार्ता : म्हापशात मासळीची आवक घटल्याने दर चढेच

म्हापसा : येथील बाजारपेठेत भाजीपाला आणि कडधान्याचा दर स्थिर आहे. तर मासळीची आवक कमी असल्याने मच्छीचा दर चढाच आहे.

भाजीपाल्याचा किलो मागे किरकोळ दर, टॉमेटो ४० रुपये, बटाटे ४० रुपये, कांदा ४० रुपये, गाजर ८० रुपये, वांगी ५० रुपये, ढब्बू मिरची ६० रुपये, कोबी ३० रुपये, कॉली फ्लॉवर ३० रुपये, दुधी ३० रुपये, काबूल (चिटकी) ५० रुपये, मिरची ८० रुपये, आले १०० रुपये, लसूण २६० रुपये, भेंडी ६० रुपये, लिंबू ५ रुपये नग, पालक १५ रुपये जुडी, तांबडी भाजी १५ रुपये जुडी, कोथिंबीर २० रुपये जुडी, शेपू १५ रुपये जुडी, कांदा पात १० रुपये जुडी, मेथी १५ रुपये जुडी, मका ५० रुपयांना तीन नग, कारले ४० रुपये, दोडके ६० रुपये, बीट ८० रुपये, वालपापडी १६० रुपये, वाल ८० रुपये, काकडी ३० रुपये, नारळ ३० ते ५० रुपये नग, मशरूम ५० रुपये, बेबीकॉर्न ५० रुपये, नीरफणस २०० ते ४०० रूपये.

तुरडाळ १४० ते १६० रुपये, चवळी १४० रुपये, मूग १२० रुपये, मसूर १०० रुपये, वाटाणे ८० रुपये, हिरवे वाटाणे १२० रुपये, हरभरे १०० रुपये, सोनामसूरी तांदूळ ६० रुपये, बासमती तांदूळ ६० ते १२० रुपये, गहू ४० रुपये, नाचणे ५० रुपये, साखर ५५ रुपये, गुळ ७० रुपये, चहा पावडर २८० रुपये, आटा ५० रुपये, पामतेल २०० रुपये लिटर असा दर आहे.

फळांमध्ये सफरचंद ५०० रुपये किलो, संत्रे ४०० रुपये किलो, मोसंबी ४०० रुपये किलो, पपई ६० रुपये किलो, पेरू ४०० रूपये किलो.

चिकन २०० रुपये किलो, मटण ९०० रुपये किलो व अंडी ८५ रुपये डझन. फुलांमध्ये झेंडू ६० रुपये, शेवंती ८० रुपये किलो.










हेही वाचा
सर्व पहा