कुरकुरीत बेसन पोटॅटो पॉकेट

Story: चमचमीत रविवार |
08th August, 11:28 pm
कुरकुरीत बेसन पोटॅटो पॉकेट

ही रेसिपी नेहमीच्या वडापाव किंवा बेसन डोशापेक्षा वेगळी दिसते आणि नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या खाण्यासाठी उत्तम आहे.

साहित्य : ४–५ उकडलेले बटाटे

  १ मोठी वाटी बेसन

  २ लहान चमचे गरम मसाला

  १ बारीक चिरलेला कांदा

  १ टोमॅटो बारीक चिरलेला

  २ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)

  ४–५ लसूण पाकळ्या (ठेचलेल्या/बारीक चिरलेल्या)

  १ लहान चमचा मोहरी

  ८–१० कढीपत्त्याची पाने

  १ लहान चमचा हळद

  चिमूटभर ओवा

  चिमूटभर हिंग

  बारीक चिरलेली कोथिंबीर

  चवीनुसार मीठ

  आवश्यकतेनुसार पाणी

  तेल (भाजण्यासाठी)

कृती : १. सारण तयार करणे: उकडलेले बटाटे नीट कुस्करून घ्या. त्यात कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित एकत्र करून सारण तयार करा.

२. पीठ भिजवणे: दुसऱ्या भांड्यात बेसन, हळद, ओवा, हिंग, मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून थोडे घट्टसर पीठ तयार करून घ्या.

३. पॉकेट बनवणे: तवा गरम करून त्यावर १ लहान चमचा तेल सोडा. आता त्यावर बेसनाचे मिश्रण थोडे पसरवा.

४. सारण भरणे व भाजणे: बेसन अर्धवट शिजल्यावर त्याच्या मध्यभागी बटाट्याचे सारण ठेवा. आता चारही बाजूंनी दुमडून (पॉकेटचा आकार देऊन) बंद करा. दोन्ही बाजूंनी मंद आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घ्या.

 सर्व्हिंग टिप: गरमागरम पॉकेटचे तुकडे करून हिरवी चटणी, लसूण चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा!


- संचिता केळकर