पणजी : पोलीस खात्यातील निलंबित निरीक्षक सुनील गुडलर यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे. त्यांची गोवा राखीव दलात बदली करण्यात आली आहे. याशिवाय निरीक्षक राझाशद शेख यांची बदली गोवा राखीव दलात करण्यात आली आहे. याशिवाय पोलीस खात्यातील १९ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश पोलीस मुख्यालयाचे अधीक्षक तुषार वेर्णेकर यांनी जारी केला.
जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, पोलीस निरीक्षक सुनील गुडलर आणि निरीक्षक राझाशद शेख यांची बदली गोवा राखीव दलात (जीआरपी) केली आहे. याशिवाय हवालदार ऐयास शेख यांची आगशी पोलीस स्थानक, कॉ. बिलाल शेख यांची वेर्णा पोलीस स्थानक, मोहीद्दीन नदाफ यांची वास्को मुरगाव पोलीस स्थानक, रमेश राऊळ यांची वास्को विशेष विभाग, सय्यद अश्रफ, धनंजय सावंत देसाई, अफश शाह, परेश आजगावकर, सद्दाम शेख, शिवराज मंगेशकर, राकेश बोगीयार, ज्ञानेश्वर नाईक, तेजस नाईक, शुभम शिरवईकर, मुकेश कुंकळ्येकर, अल्ताफ शेख, नवनाथ शेंडेकर, अकबर शेख आणि महिला कॉ. लवनिया कुंछी यांची वास्को पोलीस स्थानकात बदली केली आहे.


