पणजी : सिंकेरी येथे आग्वाद किल्ल्याजवळ समुद्रात शुक्रवारी सकाळी मासेमारीसाठी गेलेली एक होडी उलटल्याने मोठी खळबळ उडाली. होडीत एकूण पाच जण होते. स्थानिक मच्छीमार, किनारी पोलिसांच्या तत्परतेमुळे संभाव्य दुर्घटना टळली.
होडी उलटल्यानंतर त्यापैकी दोघांनी प्रसंगावधान राखत पोहत आग्वाद किनारा गाठला. उर्वरित तिघे समुद्रात अडकले. त्यांची किनारी पोलीस आणि स्थानिक मच्छीमारांनी तातडीने शोध मोहीम राबवत रेईस मागोस येथे सुखरूप सुटका केली.
या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. पाच जण सुरक्षित असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. किनारी पोलीस आणि स्थानिक मच्छीमारांच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.


