कुडचडेत अमित पाटकर यांनी घेतला पायीवारीत सहभाग

मतदारसंघातील व्यापक जनसंपर्क अभियानाची सुरुवात


12th July, 12:13 am
कुडचडेत अमित पाटकर यांनी घेतला पायीवारीत सहभाग

कुडचडे येथे वारीत सहभागी झालेले काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर व इतर.
गोवन वार्ता न्यूज डेस्क
कुडचडे : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी कुडचडे मतदारसंघातील व्यापक जनसंपर्क अभियानाची सुरुवात पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या वारीत सहभागी होऊन केली. संत श्री ज्ञानेश्वर माऊली वारकरी ट्रस्टचे डॉ. गुरुदास नाईक यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या दिंडीतील वारकऱ्यांसोबत काही अंतर चालून पाटकर यांनी पायीवारीत सहभाग घेतला.
वारी ही भारताच्या आध्यात्मिक आणि सामाजिक परंपरेचे प्रतीक असल्याचे सांगून पाटकर यांनी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या समता, सेवा आणि भक्तीच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. लोकप्रतिनिधींनी केवळ निवडणुकीत नव्हे, तर वर्षभर जनतेमध्ये राहून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत, असे ते म्हणाले.
येत्या काही महिन्यांत कुडचडे मतदारसंघातील प्रत्येक गाव आणि प्रभागात जाऊन नागरिकांशी संवाद साधणार आहे. विकास, रोजगार, पायाभूत सुविधा आणि पारदर्शक प्रशासनासाठी जनआंदोलन उभारण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. वारकऱ्यांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचा दावा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला.

हेही वाचा
सर्व पहा
महत्वाच्या बातम्या
सर्व पहा