Home >> गोवा >> अमीत शहा, देवेंद्र फडणवीस ७ सप्टेंबरला गोव्यात

अमीत शहा, देवेंद्र फडणवीस ७ सप्टेंबरला गोव्यात

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
21 mins ago
अमीत शहा, देवेंद्र फडणवीस ७ सप्टेंबरला गोव्यात

पणजी : गोवा, गुजरात,  महाराष्ट्र, दादरा आणि नगर हवेली,  दमण आणि दीव या राज्यांचा व संघप्रदेशांचा समावेश असलेल्या पश्चीम विभाग मंडळाची २८ वी बैठक ७ सप्टेंबर रोजी गोव्यात होणार आहे.  पश्चीम विभाग मंडळाचे अध्यक्ष तथा केंद्रीय गृह, सहकारमंत्री अमीत शहा (Amit Shah),  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (Chief Minister, Maharashtra) देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. 

या बैठकीची तयारी करण्यासंदर्भात केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमी‌त शहा यांनी यापूर्वीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. गोव्यातील या मंडळाचे सदस्य व सल्लागार यांना या बैठकीत सहभागी होण्यासाठी कळवण्याचे ही सूचित करण्यात आले आहे. या बैठकीसाठी सर्व आवश्यक तयारी करण्याची सूचनाही गोवा सरकारला करण्यात आली आहे.  


हेही वाचा
सर्व पहा