यूकेच्या ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये गौरव

पणजी : गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष तथा फातोर्डा मतदारसंघाचे आमदार विजय सरदेसाई (Vijay Sardesai, President Goa Forward Party) यांना युनायटेड किंग्डम (यूके) (United Kingdom) येथील ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट राजकारणी' (पॉलिटिशियन ऑफ द इयर' ) (Politician of the year) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा सन्मान त्यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदान, लोकाभिमुख नेतृत्व, लोकशाही मूल्यांप्रती असलेली बांधिलकी आणि सामाजिक-राजकीय क्षेत्रातील कार्याची दखल घेत प्रदान करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर विजय सरदेसाई यांनी हा सन्मान गोव्यातील जनतेला, आपल्या सहकाऱ्यांना आणि गोवा फॉरवर्ड पक्षाच्या कार्यकर्त्यांना समर्पित केला. लोकांचा विश्वास आणि पाठिंबा हीच आपल्या कार्याची खरी प्रेरणा असल्याचे त्यांनी सांगितले. गोव्यातील विविध राजकीय, सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रातील मान्यवरांनी सरदेसाई यांचे अभिनंदन करत त्यांच्या या आंतरराष्ट्रीय सन्मानाचे स्वागत केले.