अधिक रकमेचे योगदान पूर्णपणे ऐच्छिक असेल

नवी दिल्ली :देशातील सुमारे आठकोटी सक्रिय सदस्यांसाठीकर्मचारी भविष्य निर्वाहनिधी (EPF) नियमांमध्येमोठा बदल करण्यात आला आहे.नव्या नियमांनुसार,दरमहा १५ हजार रुपयांच्यावैधानिक वेतनमर्यादेपर्यंतचे१२ टक्के योगदान अनिवार्यराहणार आहे. त्यानुसारकर्मचाऱ्यांच्या पगारातूनजास्तीत जास्त १,८००रुपये कपात केली जाईल.यापेक्षा अधिक रकमेचेयोगदान मात्र पूर्णपणे ऐच्छिकअसेल. (EPFcontributions above Rs 1800/month to be voluntary)
यामुळे एखाद्याकर्मचाऱ्याचा मूलभूत पगारएक लाख रुपये असला, तरीत्याच्याकडून आणि नियोक्त्याकडूनअनिवार्य स्वरूपात केवळ १,८००रुपयांचेच भविष्य निर्वाहनिधी योगदान जमा केले जाईल.मात्र, कर्मचाऱ्यांनानिवृत्तीनंतरच्या आर्थिकसुरक्षिततेसाठी अतिरिक्तरक्कम स्वेच्छेने जमा करण्याचापर्याय उपलब्ध राहणार आहे.
२०२६च्या कर्मचारीभविष्य निर्वाह निधी योजनेअंतर्गतअधिसूचित करण्यात आलेल्यातरतुदीनुसार, कर्मचारीवैधानिक वेतन मर्यादेपेक्षाअधिक वेतनावरही ठराविक दरानेकिंवा त्याहून जास्त दरानेस्वेच्छेने योगदान देऊ शकतील.
या अतिरिक्त योगदानाबाबतनियोक्त्यांवर समान रक्कमभरण्याची सक्ती नसणार. तसेच कर्मचारी आणिनियोक्ता दोघांनाही हे अतिरिक्तयोगदान कोणत्याही वेळी कमीकरण्याचा किंवा बंद करण्याचाअधिकार देण्यात आला आहे.
दरम्यान, ईपीएफओनेभविष्य निर्वाह निधी काढण्याच्याप्रक्रियेतही मोठे सुलभीकरणकेले आहे. पैसेकाढण्यासाठी असलेल्या १३वेगवेगळ्या श्रेणी कमी करूनकेवळ तीन प्रमुख श्रेणी ठेवण्यातआल्या आहेत.
केंद्रीय विश्वस्तमंडळाच्या बैठकीत या बदलांवरसविस्तर चर्चा करण्यात आलीहोती. नव्या कामगारसंहितांच्या उद्दिष्टांशीसुसंगत राहून सदस्यांनात्यांच्या निवृत्ती बचतीबाबतअधिक स्वायत्तता आणि लवचिकतामिळावी, या हेतूनेहे बदल करण्यात आल्याचेअधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.