Home >> गोवा >> १.२० लाखांच्या अमलीपदार्थांसहीत संशयित म्हापसा पोलिसांच्या जाळ्यात

१.२० लाखांच्या अमलीपदार्थांसहीत संशयित म्हापसा पोलिसांच्या जाळ्यात

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
5 hours ago
१.२० लाखांच्या अमलीपदार्थांसहीत संशयित म्हापसा पोलिसांच्या जाळ्यात

पणजी : गोवा पोलिसांच्या (Goa Police)  गुन्हे शाखेने म्हापसा परिसरात कारवाई करत ड्रग्ज पुरवठ्यासाठी आलेल्या एका संशयिताला अटक केली आहे. या कारवाईत सुमारे १.२० लाख रुपये किमतीचे अमलीपदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक जीवबा दळवी (Jivaba Dalvi,Superintendent of Police, Crime Branch)  यांनी दिलेल्या माहितीनुसार,  म्हापसा येथे एका दुचाकीवरून अंमली पदार्थांचा पुरवठा करण्यासाठी एक व्यक्ती येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले.

चौकशीत संशयिताची ओळख रामेश्वर राजेंद्र धारगळकर  (वय २९, रा. मुनंगवाडा, आसगाव, बार्देस)  अशी पटली. त्याच्याकडून ८.९८६ ग्रॅम वजनाच्या एक्स्टसी टॅब्लेट जप्त करण्यात आल्या.  याशिवाय त्याची दुचाकी आणि अन्य साहित्यही पोलिसांनी जप्त केले आहे.

या प्रकरणी संशयिताविरोधात अंमली पदार्थ विरोधी (एनडीपीएस) १९८५ च्या कलम २२ (ब) अंतर्गत गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली. 

ही कारवाई पोलीस अधीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक मंगेश वळवईकर आणि महेश गडेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही धाड टाकली.  यापुढेही अशाच धडक कारवाया करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक जीवबा दळवी यांनी सांगितले.

हेही वाचा
सर्व पहा