Home >> गोवा >> साखळीच्या श्री विठ्ठल मंदिरावर सुवर्ण कळसाची प्रतिष्ठापना

साखळीच्या श्री विठ्ठल मंदिरावर सुवर्ण कळसाची प्रतिष्ठापना

मंत्री राणे यांच्या कुटुंबाकडून अनेक मंदिरांना सोन्याच्या वस्तू अर्पण

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
साखळीच्या श्री विठ्ठल मंदिरावर सुवर्ण कळसाची प्रतिष्ठापना

साखळी : साखळी येथील प्रसिद्ध श्री विठ्ठल मंदिरावर आज सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास शुभ मुहूर्तावर सुवर्ण कळसाची प्रतिष्ठापना करण्यात आली. राज्याचे मंत्री विश्वजीत राणे यांच्या हस्ते हा सुवर्ण कळस मंदिराच्या शिखरावर विधिवत बसविण्यात आला.साखळी येथील प्रसिद्ध श्री विठ्ठल रखुमाई मंदिरावर आज सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास शुभ मुहूर्तावर सुवर्ण कळसाची प्रतिष्ठापना करण्यात आली. आरोग्यमंत्री मंत्री विश्वजीत राणे यांच्या हस्ते हा सुवर्ण कळस मंदिराच्या शिखरावर विधिवत बसविण्यात आला. त्यांनीच हा सुवर्ण कळस श्री चरणी अर्पण केला आहे. 

धार्मिक विधी, मंत्रोच्चार आणि भक्तांच्या उत्साहपूर्ण उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. सुवर्ण कळसाच्या प्रतिष्ठापनेमुळे मंदिराच्या वैभवात आणि धार्मिक महत्त्वात आणखी भर पडली असून, साखळीकरांसाठी हा ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण ठरला असल्याच्या प्रतिक्रिया भाविकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.  या प्रसंगी मंदिर समितीचे पदाधिकारी, मान्यवर नागरिक तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

दरम्यान, मंत्री विश्वजीत राणे व त्यांच्या कुटुंबाने अनेक मंदिरांना सोन्याच्या वस्तू अर्पण केल्या आहेत. विठ्ठलापूर, साखळी येथील श्री विठ्ठल रखुमाई सोन्याचा कळस बसवण्यात आला. उपलब्ध माहितीनुसार, खालील मंदिरांनाही त्यांनी व त्यांच्या कुटुंबाने सोन्याच्या वस्तू अर्प‌ित केल्या आहेत.  ‍

श्री देव बोडगेश्वराला सोन्याची मशाल

म्हापसा येथील श्री देव बोडगेश्वराला आरोग्यमंत्री विश्वजीत राणे व त्यांच्या कुटुंबाने वडील माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांच्या ८३ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून २०२३ मध्ये सोन्याची मशाल  अर्प‌ित केली होती.

श्री अंबाबाई मंदिराला अडीच कोटींचा सुवर्णकलश 

मंत्री विश्वजीत राणे व त्यांचे वडील माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी कोल्हापूर येथील पुरातन श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराला २.५ कोटी रुपयांहून अधिक किमतीचा, १३.५ फूट उंचीचा सुवर्णमयी कलश अर्पण केला होता. या नवीन कलशाने जुन्या सिमेंटच्या कळसाची जागा घेतली.  जुन्या कळसामुळे गळतीची समस्या निर्माण झाली होती.  त्यामुळे मंदिराच्या प्राचीन रचनेला धोका निर्माण झाला होता. या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च राणे कुटुंबाने केला होता. 

श्री शांतादुर्गा मंदिराला सोन्याची छत्री, उत्सवमूर्ती अर्पण 

गोव्यातील कारापूर येथील श्री शांतादुर्गा मंदिराला सोन्याची छत्री व उत्सवमूर्ती अर्पण केली होती. 

केरीतील श्री आजोबा मंदिराचे नूतनीकरण 

 केरी येथील श्री आजोबा मंदिराचे पूर्ण नूतनीकरणही केले होते. 

हेही वाचा
सर्व पहा