Home >> गोवा >> साखळीच्या नगराध्यक्षा सिध्दी प्रभू यांचा राजीनामा

साखळीच्या नगराध्यक्षा सिध्दी प्रभू यांचा राजीनामा

इतरांनाही संधी मिळावी म्हणून घेतला निर्णय

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
7 hours ago
साखळीच्या नगराध्यक्षा सिध्दी प्रभू यांचा राजीनामा

साखळी : साखळी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सिध्दी प्रभू पोरोब यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर इतर सदस्यांनाही नगराध्यक्षपदाची संधी आणि लाभ मिळावा, या उद्देशाने आपण स्वेच्छेने पदाचा त्याग केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नगराध्यक्ष म्हणून काम करताना शहराच्या विकासासाठी विविध उपक्रम आणि प्रकल्प राबविण्याची संधी मिळाली. या काळात नागरिकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देत विकासकामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी डॉ. प्रमोद सावंत यांच्या भक्कम पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मुख्यमंत्री आणि पक्ष संघटनेच्या सहकार्यामुळे नगराध्यक्ष म्हणून प्रभावीपणे काम करता आले आणि शहराच्या विकासासाठी अनेक निर्णय घेता आले, याचे समाधान असल्याचे सिध्दी प्रभू पोरोब यांनी नमूद केले आहे. 

हेही वाचा
सर्व पहा