Home >> गोवा >> बार्देशमधील दोन फेक कॉल सेंटरवर छापा

बार्देशमधील दोन फेक कॉल सेंटरवर छापा

३४ जणांना अटक, ५० लाखांचे साहित्य जप्त

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
2 hours ago
बार्देशमधील दोन फेक कॉल सेंटरवर छापा

म्हापसा: बार्देश तालुक्यातीलकिनारी भागात कळंगुट व हणजूणयेथे थाटलेल्या आणि अमेरिकननागरिकांना लुबाडणार्‍याबेकायदा कॉल सेंटरचा स्थानिकपोलिसांनी पदार्फाश केला.या प्रकरणी एकूण ३४संशयित आरोपींना अटक करूनसुमारे ५० लाखांचा माल जप्तकरण्यात आला आहे. माहितीव तंत्रज्ञान कायदा तसेचभारतीय न्याय संहितेच्याआधारे संशयित आरोपींविरुद्धफसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यातआला आहे. सर्वांनाजेरबंद करण्यात आले आहे.
मंगळवारीपहाटेच्या सुमारास पोलिसांनीही कारवाई केली. खोब्रावाडाकळंगुट येथील एका रिसॉर्टमध्येबेकायदा कॉल सेंटर सुरू असल्याचीमाहिती कळंगुट पोलिसांनामिळाली होती. पोलीसनिरीक्षक लक्षी आमोणकर यांच्यानेतृत्वाखाली पोलिसांनी यारिसॉर्टवर छापा टाकला.यावेळी तिथे कॉल सेंटरचाव्यवहार सुरू होता. याकॉल सेंटरमध्ये असलेल्या १९जणांना ताब्यात घेतले व नंतरत्यांना अटक करण्यात आली.

मोबाईल, लॅपटॉपव इतर वस्तू मिळून अंदाजे २५लाखांचे साहित्य जप्त करण्यातआले.
दुसरी कारवाईचिवार येथे हणजूण पोलिसांनीकेली. पोलीस निरीक्षककृष्णा सिनारी यांच्यानेतृत्वाखालील पोलिसांनीएका रिसॉर्टवर छापा टाकलाआणि अवैधरीत्या चालवले जाणार्‍याकॉल सेंटरचा पदार्फाश केला.पोलिसांनी या छापेमारीमध्येएकूण १५ जणांना अटक केली आणिमोबाईल, लॅपटॉप वइतर मिळून अंदाजे २५ लाखांच्यावस्तू जप्त केल्या.
संशयितआरोपी कॉल सेंटरच्या माध्यमातूनअमेरिकन नागरिकांशी संपर्कसाधत होते. कर्जआणि त्वरित रोख रक्कम देण्याचेत्यांना आमिष दाखवून गिफ्टकार्ड्सद्वारे लुबाडत होते.विदेशी नागरिकांकडूनआलेल्या तक्रारींच्या आधारेकळंगुट व हणजूण पोलिसांनी हीकारवाई केली.
दोनमहिन्यांपूर्वीही अशीचकारवाई
दरम्यान,दोन महिन्यांपूर्वी२७ मार्च रोजी सायबर गुन्हाशाखेकडून म्हापशात चालवण्यातयेणार्‍या अशाच प्रकारच्याफेक कॉल सेंटरचा पदार्फाशकेला होता. घाटेश्वरनगरखोर्ली येथील एका बंगल्यावरछापा टाकून ७ जणांना अटक केलीहोती व २१ लाखांच्या वस्तूजप्त केल्या होत्या.

हेही वाचा
सर्व पहा