Home >> गोवा >> वास्कोतील वोड्डांत येथे मोठा दगड घरावर कोसळल्याने नुकसान

वास्कोतील वोड्डांत येथे मोठा दगड घरावर कोसळल्याने नुकसान

सुदैवाने कुणालाही दुखापत नाही

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
49 mins ago
वास्कोतील वोड्डांत येथे मोठा दगड घरावर कोसळल्याने नुकसान

वास्को : वास्कोतील वोड्डांत परिसरात मोठा दगड घसरत येऊन  प्रमोदिनी नाईक यांच्या घरावर कोसळल्याने मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच वास्को अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि परिसराची पाहणी करून आवश्यक सुरक्षेची उपाययोजना केली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान,  काँग्रेस पक्षाचे वास्कोचे नेते तथा प्रभाग नगरसेवक नंदादीप राऊत यांनी सांगितले की, वोड्डांत परिसरात डोंगरकड्यालगत संरक्षक भिंत (रिटेनिंग वॉल) उभारण्याची मागणी करण्यात आली होती. अनेक वेळा लेखी निवेदन देण्यात आले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

राऊत यांनी आरोप केला की, स्थानिक नागरिकांच्या सुरक्षे सारख्या गंभीर प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या समस्यांकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.


हेही वाचा
सर्व पहा