
पणजी : हळदोणा येथे मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे मोठे झाड घराबाहेरील पार्किंग शेडसहीत दोन वाहनांवर पडल्याने मोठे नुकसान झाले.
परिसरात जोरदार पाऊस आणि वारा सुरू होता. त्यावेळी अचानक मोठे झाड शेडवर कोसळले. या घटनेत पार्किंग शेडचा काही भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. शेडमध्ये असलेल्या दोन वाहनांचेही मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नाही.