
पणजी: एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार व लैंगिक छळ केल्याप्रकरणी पडोसे, सत्तरी येथे वास्तव्यास असलेल्या अविनाश जाधव या २० वर्षीय युवकास अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या संशयित युवकाला आज वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी डिचोली पोलीस अधिक तपास करीत असून, जबान्या नोंदवणे सुरू आहे.