Home >> गोवा >> दांडोसवाडो-मांद्रे येथील निवासी प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

दांडोसवाडो-मांद्रे येथील निवासी प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

३२ फ्लॅट्सच्या प्रकल्पाचा परवाना रद्द करण्याची मागणी

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
दांडोसवाडो-मांद्रे येथील निवासी प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

पेडणे : मांद्रे (Mandrem)  येथील दांडोसवाडो परिसरात प्रस्तावित करण्यात आलेल्या ३२ फ्लॅट्सच्या निवासी प्रकल्पाला (Mandrem mega residential project) स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.  या प्रकल्पाचा परवाना तातडीने रद्द करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

दांडोसवाडो (वार्ड क्रमांक ११) परिसरात भविष्यात बंगले, फ्लॅट्स तसेच मोठ्या निवासी प्रकल्पांना परवानगी देऊ नये, अशी भूमिकाही ग्रामस्थांनी स्पष्ट केली. यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर स्वाक्षऱ्या घेऊन निवेदन सरपंच किरण सावंत तसेच स्थानिक आमदारांकडे सादर करण्यात आले.

या वेळी अॅड. प्रसाद शहापूरकर, सूर्यकांत कलशांवकर, संजय नाईक, सावळाराम कलशांवकर, उमेश कलशांवकर, रतिका उमेश कलशांवकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन सरपंच किरण सावंत यांनी दिले.

हेही वाचा
सर्व पहा