Home >> ताज्या बातम्या >> ऑगस्टपासून बेकायदा बोअरवेल करणार सील

ऑगस्टपासून बेकायदा बोअरवेल करणार सील

जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांची माहिती


01st July, 11:45 pm
ऑगस्टपासून बेकायदा बोअरवेल करणार सील

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : राज्यातील बेकायदा बोअरवेल सील करण्याची मोहीम ऑगस्ट महिन्यापासून सुरू करण्यात येणार आहे. बेकायदा बोअरवेलवर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून त्यानुसार ही मोहीम राबवली जाईल, अशी माहिती जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.
जलस्रोत खात्याकडे सध्या राज्यातील २२४ बेकायदा बोअरवेलची नोंद आहे. या सर्व बोअरवेलना सील करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील सर्व बोअरवेलचे सर्वेक्षण आणि पडताळणी करण्याचे निर्देश सरकारने जलस्रोत खात्याला दिले आहेत. या तपासणीनंतर बेकायदा बोअरवेलची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अलीकडेच चिंबल परिसरातील सुमारे ७० बोअरवेल सील करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले होते. या कारवाईदरम्यान काही ठिकाणी विरोध झाल्याने खात्याला पोलिसांची मदत घ्यावी लागली होती.
बोअरवेलांच्या वाढत्या वापरामुळे भूजलसाठ्यावर परिणाम होत असल्याने सरकारने नव्या बोअरवेलना मंजुरी देणे बंद केले आहे. भूजलाचे संवर्धन आणि पाण्याचा शाश्वत वापर सुनिश्चित करण्यासाठी बेकायदा बोअरवेलविरोधातील कारवाई अधिक कठोर करण्यात येणार आहे, असेही जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी स्पष्ट केले.