होंडा येथे झोपडीला भीषण आग; तीन लाखांचे नुकसान

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
होंडा येथे झोपडीला भीषण आग; तीन लाखांचे नुकसान

पणजी : सत्तरी तालुक्यातील (Sattari Taluka)  होंडा येथील गावकरवाडा परिसरात मध्यरात्री एका झोपडीला भीषण आग लागून सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, गावकरवाडा, होंडा येथील रहिवासी नरेश गावकर यांच्या झोपडीला रात्री अचानक आग लागली. आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केल्याने झोपडीतील साहित्य जळून खाक झाले.

घटनेची माहिती मिळताच वाळपई अग्निशामक दलाचे जवान (Valpoi Fire Station) तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत झोपडी जळून खाक झाली होती. 

या आगीत अंदाजे तीन लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले असून, कोणतीही मालमत्ता वाचविता आली नसल्याची माहिती अग्निशामक दलाकडून देण्यात आली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.

स्थानिकांच्या सतर्कतेमुळे आणि अग्निशामक दलाच्या त्वरित प्रतिसादामुळे आग परिसरातील इतर घरांमध्ये पसरण्यापासून रोखण्यात यश आले.

हेही वाचा