करंझाळेतील आयवाव समुद्र किनाऱ्यावर महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
16 mins ago
करंझाळेतील आयवाव समुद्र किनाऱ्यावर महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला

पणजी : करंझाळे परिसरातील आयवाव (Aivavo) समुद्र किनाऱ्यावर एका महिलेचा अत्यंत कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह किनाऱ्यावर वाहून आल्याचे आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पणजी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा व अन्य प्राथमिक प्रक्रिया सुरू केली.

प्राथमिक माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी मांडवी पुलावरून उडी घेतल्याची नोंद असलेल्या महिलेच्या प्रकरणाशी या मृतदेहाचा संबंध आहे का, याची पोलिसांकडून पडताळणी करण्यात येत आहे. मात्र, मृतदेहाची अधिकृत ओळख अद्याप पटलेली नसून याबाबत कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.

मृतदेहाची अवस्था अत्यंत कुजलेली असल्याने ओळख पटविण्याचे काम आव्हानात्मक ठरत आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला असून; शवविच्छेदन अहवाल आणि ओळख पटविण्याच्या प्रक्रियेनंतर अधिक माहिती समोर येणार आहे. याप्रकरणी पणजी पोलीस (Panjim Police) अधिक तपास करीत आहेत. 

हेही वाचा