जेएसओ - पोस्ट भरणे आहेत (जीपीएससी)

गोवा लोकसेवा आयोगातर्फे (GPSC) ज्युनिअर स्केल ऑफिसर पदाच्या भरती प्रक्रियेची माहिती दिली असून, त्यात परीक्षेचे टप्पे, गुणदान पद्धत, पात्रता आणि सविस्तर अभ्यासक्रमाचे अचूक व महत्त्वपूर्ण मार्गदर्शन.

Story: यशस्वी भव: |
06th June, 11:09 pm
जेएसओ - पोस्ट भरणे आहेत (जीपीएससी)

​ज्युनिअर स्केल ऑफिसर या नावाची एक खूप मोठी पोस्ट जीपीएससीतर्फे भरावयाची आहे. ही पोस्ट म्हणजे जणू डेप्युटी कलेक्टरच्या रँकची आहे. जसे भारतीय प्रशासनामध्ये आय.ए.एस., आय.पी.एस. अशा प्रशासकीय पोस्ट असतात, त्याच प्रकारे राज्यामध्ये स्केल ऑफिसर्सच्या पोस्ट असतात. सिव्हिल सर्व्हंट म्हणून त्यांची नियुक्ती होते. या पोस्ट्स गॅझेटेड पोस्ट असतात. सर्व सरकारी पातळीवर राज्य सरकारचे सेक्रेटरी लेव्हलच्या या पोस्ट असतात. ज्युनिअर स्केल ऑफिसर ही अशीच एक गोवा राज्य सरकारमध्ये खूप मोठी पोस्ट समजली जाते. सध्या यासाठी ३८ पोस्टचे नोटिफिकेशन निघालेले आहे. जीपीएससीतर्फे परीक्षा घेतली जाणार असून प्री-स्क्रीनिंग, स्क्रीनिंग तसेच लेखी परीक्षा आणि मुलाखत अशा चार 'टायर'मधून ही परीक्षा घेतली जाते. प्री-स्क्रीनिंग आणि स्क्रीनिंग ही परीक्षा बहुपर्यायी प्रश्न पद्धतीने घेतली जाते, तर पुढे लेखी परीक्षा आणि मुलाखत असा हा प्रवास असतो.

ज्युनिअर स्केल ऑफिसर ऑफ गोवा सिव्हिल सर्विसच्या ३८ पोस्ट भरायच्या आहेत. या ३८ मध्ये ११ - ओबीसी, ५ - इकॉनॉमिकली बॅकवर्ड सेक्शन, ६ - एसटी आणि १६ ओपनसाठी भरती आहे. व उरलेल्या पोस्ट काहींसाठी रिझर्व्ह आहेत. यासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर चालतो, ज्यांचे वय ४० पेक्षा जास्त नसावे. तसेच त्याला कोकणी भाषेचे ज्ञान असावे. मराठी देखील बोलता आले पाहिजे. अॅप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर पहिली प्री-स्क्रीनिंग टेस्ट होते. ७५ मिनिटांची ही एमसीक्यू पद्धतीची परीक्षा आहे. पेपरचे ४ भाग केले असून प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळी प्रश्नपत्रिका येणार आहे. सर्वांचे प्रश्न समान असतील परंतु क्रम वेगवेगळा असेल. प्रत्येकी ६० प्रश्न विचारले जातील. याला निगेटिव्ह मार्किंग नाही. त्यामुळे बरोबर उत्तराला एक मार्क तर चुकीच्या उत्तराला शून्य मार्क देण्यात येईल. यात जनरल इंटेलिजन्स, रिझनिंग, न्यूमेरिकल अॅप्टिट्युड यावर ५० प्रश्न आहेत. नंबर सिरीज, व्हर्बल क्लासिफिकेशन, अॅनालॉजीज, मॅचिंग डेफिनेशन, व्हर्बल रिझनिंग, स्टेटमेंट अँड अझम्पशन्स, स्टेटमेंट अँड कन्क्लुशन्स, जजमेंट ऑन कॉज अँड इफेक्ट, लेटर आणि सिम्बॉल सिरीज, इसेन्शिअल पार्ट, प्रॉब्लेम आर्टीफिशियल लँग्वेज, मेकिंग जजमेंट्स, अॅनालायझिंग अर्ग्युमेंट्स, कोर्स ऑफ अॅक्शन, लॉजिकल प्रॉब्लेम्स, थीम डिटेक्शन, स्टेटमेंट अँड अर्ग्युमेंट, ऑड मॅन आउट अँड सिरीज, प्रॉब्लेम्स ऑन सिटिंग, वर्ड फॉर्मेशन, रँकिंग अरेंजमेंट, वेन डायग्राम, अरेंजमेंट ऑफ फॅमिली ट्री, कोडिंग-डीकोडिंग, प्रॉब्लेम्स ऑन टाईम / डिस्टन्स इत्यादी विषयांवर ५० प्रश्न विचारले जाणार आहेत. इंग्रजी निबंध व त्यावरील प्रश्नाला १० मार्क्स आहेत. ७५ मिनिटांत ६० प्रश्न सोडवायचे आहेत. ६० पैकी ३९ जनरलसाठी तर ६० पैकी ३३ कॅटेगरीसाठी पासिंग कट ऑफ आहे. जे विद्यार्थी कट ऑफच्या ३ गुणांनी मागे आहेत किंवा असतील, तर त्यांच्यासाठी परत एक प्री-स्क्रीनिंग ठेवली जाणार आहे. याला रिपीट प्री-स्क्रीनिंग टेस्ट असे म्हणतात. यासाठी परत अप्लाय करावे लागत नाही. उमेदवाराला ईमेलद्वारे कळवले जाते. जे उमेदवार प्री-स्क्रीनिंगला क्वालिफाय होतील ते पुढे स्क्रीनिंग परीक्षेला बसतील. ही पण एक कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे; यात हिस्ट्री ऑफ इंडिया अँड इंडियन नॅशनल मुव्हमेंट, इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स (राज्यघटना), पॉलिटिकल सिस्टीम, पंचायत राज, पब्लिक पॉलिसी, घटना अधिकार आणि कर्तव्य यावर १५ मार्कांचे प्रश्न विचारले जाणार आहेत. इकॉलॉजी, एन्व्हायरमेंट, बायो डायव्हर्सिटी, क्लायमेट चेंज, एअर आणि वॉटर पोल्युशन, सायन्स आणि टेक्नॉलॉजी, स्टार्टअप सीड फीडिंग, व्हेंचर कॅपिटल, अँजेल फंडिंग, इनोव्हेशन, करंट अफेयर्स, इतिहास, भूगोल, जनरल इंग्लिश व्याकरण, निबंध, लॉजिकल रिझनिंग व अॅबिलिटीवर प्रश्न विचारले जातील. ही परीक्षा ९० मिनिटांची असेल व यात ७५ प्रश्न सोडवायचे आहेत. कमीत कमी ६५% गुण मिळवावे लागतील, कॅटेगरीसाठी ५५% गुण मिळवावे लागतील. पात्र उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरतील. यात एक तासाचा एक पेपर आहे ज्यात जनरल इंटेलिजन्स, रिझनिंग व न्यूमेरिकलवर प्रश्न असतात. यात ५० प्रश्न विचारले जातील. त्यानंतर २ तासांचा एक पेपर आहे ज्यात ७५ प्रश्न विचारले जाणार. यात भारतीय राज्यघटना, गव्हर्नन्स यावर भर असेल. त्यानंतर २ तासांचा १ पेपर आहे ज्यात जनरल नॉलेज व करंट अफेयर्सवर ७५ प्रश्न विचारले जातील. चौथा पेपर हा निबंध या विषयावर आहे. इंग्रजी काँप्रिहेन्शन हा पेपर ९० मिनिटांचा असून ५० प्रश्न विचारले जातील. या चार पेपरनंतर रिझल्ट लागतो. ६५% ते ५५% एवढे किमान मार्क्स पाडावे लागतात. यानंतर तोंडी मुलाखत घेतली जाणार आहे.


अॅड. शैलेश कुलकर्णी, कुर्टी - फोंडा, ९८७५४४५३९९, (लेखक नामांकित वकील आणि करिअर समुपदेशक आहेत.)